बँकेसमोरील पुरातन विहीर बुजवण्याच्या विरोधात चार दिवसांपासून आमरण उपोषण. खा.बजरंग सोनवणे यांची उपोषण स्थळी भेट.

बँकेसमोरील पुरातन विहीर बुजवण्याच्या विरोधात चार दिवसांपासून आमरण उपोषण. खा.बजरंग सोनवणे यांची उपोषण स्थळी भेट.



अंबाजोगाई 

शहरातील महाराष्ट्र बँके शेजारी जुनी पुरातन विहीर अनेक वर्षापासून होती.  ही विहीर नगर परिषदेने बुजवुन त्या ठिकाणीअनाधिकृतपणे गाळे बांधकाम करुन ते भाडेतत्वावर दिलेले आहेत.सदरील जागेवरील अतिक्रमण काढून विहीर मोकळी करुन विहीर पुर्ववत सुरु करावी या मागणी साठी नगरपालिकेसमोर लोकजनशक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांने उपोषण सुरु केले आहे.या उपोषणास खा.बजरंग सोनवणे यांनी रविवार भेट दिली. 

महाराष्ट्र बँकेसमोर असलेली विहीर बुजवून त्याठिकाणी सुरु केलेले गाळे बंद करुन विहीर मोकळी करण्यासाठी नगर पालिकेला निवेदन देण्यात आले होते. तसेच सर्व अंबाजोगाई शहरामध्ये भिक मांगो आंदोलन करण्यात आले होते.परंतु नगर परिषदेने याची दखल न घेता सदर अतिक्रमण अद्यापपर्यंत काढलेले नाही.या विरोधात लोकजनशक्ती पार्टी युवक आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक बन्सी काळे पाटील यांनी मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मागील चार दिवसा पासून तोडगा निघाला नसल्याने आमरण उपोषण सुरुच आहे. 


खा.बजरंग सोनवणे यांची उपोषण स्थळी भेट


पुरातन वारसा असलेल्या विहिरीच्या जपणुकीसाठी सुरु असलेला हा लढाअत्यंत महत्त्वाचा आहे. लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहीले पाहीजे हे ओळखून खा.बजरंग सोनवणे यांनी उपोषण कर्ते अशोक बन्सी काळे पाटील यांची उपोषण स्थळी जाऊन चौकशी केली.यावेळी खा.सोनवणे यांच्या बरोबर माजी आ. पृथ्वीराज साठे,राष्ट्रवादी गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमूख,लोकजन शक्ती पार्टीचे राजेश वाव्हुळे,इस्माईलगवळी,मदनलाल परदेशी,रवी देशमुख,हमीद चौधरी, गणेश घाडगे इत्यादी उपस्थित होते. 


नगरपालिकेचे लेखी आश्वासन,परंतू उपोषण सुरुच 


खा.बजरंग सोनवणे यांनी उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर नगर पालिकेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी उपोषणकर्ते अशोक बन्सी काळे पाटील यांना मुख्याधिकारी यांनी दिलेले लेखी पत्र दिले.परंतू दिलेल्या पत्रात विहीरीवरील अतिक्रमण काढणार म्हणून ठोस आश्वासन दिलेले नाही.यामुळे उपोषण मरेपर्यंत सुरु राहील असेउपोषणकर्ते काळे यांनी लेखी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा