कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने स्व. मोहम्मद रफी पुण्यतिथी निमित्त गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.

कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने स्व. मोहम्मद रफी पुण्यतिथी निमित्त गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.



केज 


दिनांक ३१ जुलै रोजी स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त केज येथील कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त गीत गायन स्पर्धा संपन्न झाली.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड,भाई मोहन गुंड, शिवाजीदादा ठोंबरे,शाहीर तुकाराम ठोंबरे, ज्येष्ठ  समाजसेवक  हनुमंत भोसले,आर पी आय तालुका अध्यक्ष दीपक कांबळे,पत्रकार चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले लातूर येथील चंद्रशेखर पारशेट्टी,बीड येथील सुरेश थोरात सर,सचिन राऊत सर,  दिनकर जाधव,अमोल सावंत या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली. 

स्पर्धेला नागरिकांतून व स्पर्धका मधुन मोठा प्रतिसाद होता. या स्पर्धेसाठी बऱ्याच ठिकाणाहून स्पर्धक आले होते तर या स्पर्धेत होणारे गीत ऐकण्या करिता भरपूर संख्यांनी रसिक श्रोते उपस्थित होते.ही स्पर्धा स्त्री व पुरुष गटामध्ये घेण्यात आली.यामध्ये एकूण ५४ स्पर्धक होते  १७ महिला व ३७ पुरुष यांनी सहभाग घेतला होता.पुरुष स्पर्धकांनी स्व.मोहम्मद रफी यांचे गीत गायले व महिलांनी स्व.भारतरत्न लता दिदी मंगेशकर व इतर गायिकांचे गाणे गाऊन  रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक लातूर येथील किशोर कांबळे, द्वितीय बक्षीस महेश, तोष्णीवाल तृतीय बक्षीस सुदर्शन शिंदे,व उत्तेजनार्थ जनार्दन वडमारे यांनी पटकावले व महिलांमध्ये प्रथम बक्षीस संभाजीनगर येथील दिपाली हरणे, द्वितीय बक्षीस ललिता लांडगे,तृतीय बक्षीस सुरेखा थोटे व उत्तेजनार्थ दीक्षा कांबळे यांनी पटकावले या कार्यक्रमाची प्रस्तावना कला क्रीडाविश्व समिती चे तालुका अध्यक्ष अनिल वैरागे यांनी केली व आभार उपाध्यक्ष मुनीर कुरेशी यांनी मानले.या स्पर्धे साठी कला क्रीडा विश्व समितीचे सचिव सचिन लांडगे,बलभीम मस्के, शिवमुर्तीहजारे,कल्याण मस्के,दिलीप खाडे, अमोल सरवदे,ज्ञानेश्वर लांब,सिंधू मुळे,अनिता कसबे,छबू अंधारे या पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा