केज बसस्थानकासमोर चार वाहनांचा भीषण अपघात ; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
केज बसस्थानकासमोर चार वाहनांचा भीषण अपघात.
केज
केज शहरातील बस स्थानकासमोर शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली.एकाच वेळी चार वाहनांचा समावेश असलेल्या या साखळी अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र,काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणा वर नुकसान झाले आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास बीडहून अंबेजोगाईकडे जाणाऱ्या बस एम.एच.१३ सी यु ७३०९ बसस्थानकाच्या मधून बाहेर निघत असताना अचानक समोरून ट्रक एम.एच. २४ बी डब्लू ०३६७ आला.ट्रकने रस्त्यावर थांबलेल्या जीपला जोरदार धडक दिली. त्याच वेळी ट्रकच्या मागून भरधाव आलेली स्विफ्ट कार एम.एच. १६ बी एच ३७६७ ट्रकने अचानक ब्रेक लावल्यामुळे थेट ट्रकला धडकली.या तुफानी धडकांमुळे ट्रकचा समतोल ढासळून ट्रक खाजगी जीप वर आदळून थांबली आणि बस स्थानका मधून बाहेर येणारी बस ट्रक वर आदळली.
अपघाताची तीव्रता पाहून बस मधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.भयभीत प्रवाशांनी तात्काळ आपत्कालीन खिडकी द्वारे बाहेरपडत स्वत:चा जीव वाचवला. नागरिकांच्या सतर्कते मुळे आणि त्वरित हालचालीमुळे मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर बस स्थानक परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली.यामुळे काही काळ संपूर्ण परिसरा तील वहातुक ठप्प झाला होती.विशेष म्हणजे बसस्थानकाच्या बाहेर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अपुरा झाला असून अशा घटनांची शक्यता नेहमीच निर्माण होते. नागरिकांनी प्रशासना कडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.
अपघाताची माहिती पत्रकार प्रदिप गायकवाड यांनी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना कळविली.माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी वाहतुकीचा ताण कमी करून मार्ग मोकळा करण्याचे काम केले.या अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी बस स्थानका समोरील अतिक्रमण हटवावे, वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या केल्या आहेत.संबंधित प्रशासनाने वेळेवर लक्ष न दिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते,असा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा