कर्म करत रहा फळ मिळत राहते - समृद्धी दिवाणे
कर्म करत रहा फळ मिळत राहते - समृद्धी दिवाणे
केज
दिनांक 15 जुलै 2025 रोजी साने गुरुजी निवासी विद्यालयात गुणवत्ता विकास वाढ संदर्भाने गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील केंद्र प्रमुख व मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळांचे विस्तार अधिकारी,साधन व्यक्ती यांची बैठक संपन्न झाली.केज तालुक्या तील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक पणे आपले कर्म करावे कर्म प्रामाणिक असेल तर फळ मिळते. शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळां मधून वेगवेगळे उपक्रम घ्यावेत शिक्षकाने कृतीशील बनावे. शाळांचा शैक्षणिक दर्जा व भौतिकदर्जा उंचावणे हे आपल्या सर्वांचे काम आहे उपक्रमशील शाळा झपाट्याने पुढे सरकताना दिसतआहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवा त्याचाच एकभाग सध्या वाचन कुठेतरी थांबलेले आहे वाचन संस्कृती पुन्हा एकदा जोमाने राबवली पाहिजे. वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्या साठी शाळेत अवांतर वाचनाची पुस्तके पुस्तक पेढीच्या माध्यमातून,वाचनालया च्या माध्यमातून शिक्षकांनी उपलब्ध करून द्यावेत.यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन व स्वतः स्पॉन्सर शिप घेऊन सहा शाळांना अनुराग पुस्तकालय आंबेजोगाई चे साहित्य अभिजीत जोंधळे यांच्या माध्यमा तून पुस्तक पेटी भेट देण्यात आली.एका पेटीत पुस्तकांचे 60 ते 70 नग वयानुरूप उपलब्ध आहेत.इतरही शाळांना पुस्तकेउपलब्ध करून देण्यात येतील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी साहित्यिक अभिजीत जोंधळे यांनी पुस्तक पेटी हा उपक्रम गेली दहा वर्षापासून ज्या शाळा वाचन संस्कृती रुजवतील अशा शाळांना देत असल्याचे सांगून या पेटीत पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचन योग्य अशी पुस्तके असल्याचे मत व्यक्त केले.त्याच बरोबर शिक्षकांना वाचनीय अशी तीन ते चार पुस्तके ही या पेटीत आहेत.आपण मुलं वाचत नाहीत अशी तक्रार करतो पण मुलांना जर वाचनाला संधी उपलब्ध करून दिली नाही पुस्तके उपलब्ध करून दिली तर मुले निश्चितच वाचतात हे कर म्हणणारा कृतिशील शिक्षक असावा लागतो प्रतिकूलते वर मात करणारी पुस्तके मुलां समोर ठेवली म्हणजे मुले देखील त्यातून प्रेरित होतात प्रत्येक माणसाने आपण मोबाईलवर व्यर्थ किती वेळ घालवतो याचा विचार करावा त्या ऐवजी फक्त दहा मिनिटात दहा पाने पुस्तकातील वाचून होतील असाही निर्वाणीचा संदेश त्यांनी यावेळी बोलताना दिला. मुलं अनुकरणप्रिय असतात मोठी जे करतात तेच मुलं करतात म्हणून अगोदर मोठ्यांनी वाचायला सुरुवात करावी म्हणजे मुले आपोआप वाचतील.यावेळी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण राव बेडसकर,संस्था अध्यक्ष उद्धवराव कराड सर यांनीही मनोगत व्यक्त केले.सदर बैठकीस ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे,श्री.सुनील केंद्रे सर्व केज तालुक्याचे केंद्रप्रमुख सहा शाळांचे मुख्याध्यापक साधन व्यक्ती उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक प्रा. कविता गित्ते मॅडमयांनी केले तर सूत्रसंचालन श्री.चोले सर यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख संजय चवरे सर यांनी मांडले.पुस्तक पेटी दिलेल्या शाळा साने गुरुजी निवासीविद्यालय केज,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी,
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, भाटुंबा, माध्यमिक शाळा,मस्साजोग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमअंबा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ यांना पुस्तक पेटी प्रदान करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा