आरोग्य व पर्यावरण सेवा सप्ताहास केज मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद! महिलांच्या मोफत रक्त तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा सहभाग.

आरोग्य व पर्यावरण सेवा सप्ताहास केज मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद! महिलांच्या मोफत रक्त तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा सहभाग.










केज 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या २२ जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजीमंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या १५ जुलै वाढदिवसानिमित्त नगर पंचायत केज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,केज शहर यांच्या संयुक्त विद्यमाने "आरोग्य जनहित व पर्यावरण सेवा सप्ताह" आयोजित करण्यात आला आहे.या सेवा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी केज शहरात महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमास केजच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांच्या हस्ते नगर पंचायत कार्यालयात केज सकाळी ११ वाजता संपन्न झाले.

केज शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व आपल्या आरोग्याच्या तपासण्या करून घेतल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव जोगदंड यांनी केले. आणि आभार प्रदर्शन श्री.नागरगोजे यांनी  केले.या कार्यक्रमास कनिष्ठ अभियंता शीतल सय्यद (महावितरण), सामाजिक कार्यकर्त्या मनीषा घुले,नगरसेवक राजू इनामदार,सतीश डांगे,अशोक गायकवाड, लखन हजारे,फेरोज शेख,मनोज मस्के तसेच पत्रकार मुब्बशीर खतीब यांच्यासह केज शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा