*"युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५ " हा जागतिक स्तरावरील पुरस्कार न्युयॉर्क मध्ये अॅड. वर्षाताई देशपांडे यांना प्रधान*
*"युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५ " हा जागतिक स्तरावरील पुरस्कार न्युयॉर्क मध्ये अॅड. वर्षाताई देशपांडे यांना प्रधान*
बीड प्रतिनिधी. :- " युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड " हा जागतिक स्तरावरील पुरस्कार या पुर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १९८३ साली व उद्योजक जे. आर. डी. टाटा यांना १९९२ साली मिळाला होता. तब्बल ३३ वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर हा पुरस्कार भारताला अॅड. वर्षाताई देशपांडे यांच्या रूपाने मिळाला आहे. हा जागतिक स्तरावरील पुरस्कार म्हणजे समस्त भारतीयांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे असे लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.
न्युयॉर्क मध्ये अॅड. वर्षाताई देशपांडे यांच्या स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठीच्या व मुलींच्या जन्माचे स्वागत आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठीच्या कामाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र लोकसंख्या संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होतोय की, ॲड. वर्षाताई देशपांडे, सचिव, दलित महिला विकास मंडळ, सातारा तथा मुख्य प्रवर्तक , लेक लाडकी अभियान यांना संयुक्त राष्ट्र (UNO) च्या ‘ युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५' या पुरस्काराने पुरस्कृत व्यक्ती (Laureate) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड’ हा पुरस्कार दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 'लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात' अत्युत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिला जातो. १९८३ पासून या पुरस्काराची स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेने केली असून, जागतिक स्तरावर दिला जाणारा हा एक अत्यंत मानाचा पुरस्कार आहे.
ॲड. वर्षाताई देशपांडे यांना हा पुरस्कार लिंगभेदाच्या आधारे होणाऱ्या गर्भलिंग निवडीविरोधातील त्यांच्या संघर्षासाठी दिला गेला आहे. या कार्यामध्ये त्यांनी क्षमतावाढ, जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि समुदाय सहभाग या सर्व स्तरांवर भरीव कामगिरी केली आहे म्हणूनच वर्षाताई यांना गौरविण्यात आले आहे.
याआधी हा पुरस्कार आपल्या देशाला वैयक्तिक श्रेणीत आयर्न लेडी इंदिरा गांधी (१९८३) आणि जगप्रसिध्द उद्योजक जे. आर. डी. टाटा (१९९२) यांच्या माध्यमातून मिळाला आहे.
तसेच या वर्षी आदरणीय अॅड. वर्षाताई देशपांडे यांना हा पुरस्कार ११ जुलै २०२५ रोजी न्यूयॉर्क येथे प्रदान करण्यात आला आहे.
ॲड. वर्षाताई देशपांडे, सचिव, दलित महिला विकास मंडळ, सातारा तथा मुख्य प्रवर्तक लेक लाडकी अभियान यांची संयुक्त राष्ट्रांच्या ‘ युएन पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५ ' साठी पुरस्कृत व्यक्ती (Laureate) म्हणून निवड झाली आहे.
बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बालविवाह थांबून त्या मुलींना परत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना विविध कौशल्यांची प्रशिक्षणे दिली आहेत . त्या मुली स्वयंपूर्ण होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील यासाठी वर्षाताईनी केलेलं काम खूप मोलाचं आहे. तसेच कमी होणाऱ्या मुलींच्या संख्येबाबत त्यांनी केलेले काम, दिलेला न्यायालयीन लढा आणि जनसामान्यांची उभी केलेली लोकचळवळ तसेच महिलांचे पतीच्या बरोबरीने घर मिळकतीस मालक सदरी नाव लागण्याच्या संदर्भातील केलेले काम, लक्ष्मी मुक्ती अंतर्गत शेतजमिनीला महिलांना पतीच्या बरोबर सहमालकीन होण्यासाठी केलेले काम , दिलेला आत्मविश्वास हे ही महत्वपूर्ण ठरले.
ॲड. वर्षाताई देशपांडे यांना हा पुरस्कार लिंगभेदाच्या आधारे होणाऱ्या गर्भलिंग निवडीविरोधातील त्यांच्या संघर्षासाठी दिला जात आहे. या कार्यामध्ये त्यांनी क्षमतावाढ, जनजागृती, कायदेशीर कारवाई आणि समुदाय सहभाग या सर्व स्तरांवर भरीव कामगिरी केली आहे.
हा पुरस्कार ११ जुलै २०२५ रोजी न्यूयॉर्क येथे प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ॲड. शैलजाताई जाधव,कैलास जाधव यांच्यासह दलित महिला विकास मंडळ, सातारा चे पदाधिकारी मंडळींची उपस्थिती होती.
आदरणीय वर्षाताई देशपांडे यांना मिळालेला हा जागतिक स्तरावरील " युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५ " पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्यातील महिला व मुलींचा सन्मान आहे असे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा