महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा कंपन्यांच्या खाजगी करणा विरोधात केंद्र व राज्यसरकार विरोधात देशव्यापी संप.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा कंपन्यांच्या खाजगी करणा विरोधात केंद्र व राज्यसरकार विरोधात देशव्यापी संप.
केज
महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या संलग्न स्वतंत्र मजदूर युनीयन वतीने बुधवारी दि.09 जुलै रोजी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जे कंपन्यांचे खाजगीकरण चालू आहे त्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे या संपात केज तालुका महाराष्ट्र राज्य मागास वर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांनी,सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा असे आवाहन केज तालुका अध्यक्ष शिवाजी घुले यांनी केले आहे.सदरीलसंप विद्युत विभागातील सरकारी वीज कंपन्यांचे खाजगी करण करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणा विरोधात आहे. हा संप बहुजनांचे संविधानिक हक्क कायम ठेवण्यासाठी होत आहे,हा संप सरकार संविधानविरोधी कायदा आणत असल्या मुळे कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी होत आहे,तसेच वीज ग्राहकांच्या हितास्तव होत आहे,येणाऱ्या पिढ्यांच्या शासकीय नोकऱ्या अस्तित्वात राहाव्यात म्हणून होत आहे,शासकीय वीज कंपन्यांचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून होत आहे.तसेच इतर प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या आहेत कर्मचारी भरती तीन वर्षाकरिता कंत्राटी पद्धतीने न भरतास्थायी स्वरूपात करण्यात येईल,तसेच मागास वर्गीय कर्मचाऱ्यांना खुल्या प्रवर्गासह आरक्षित प्रवर्गातून पदोन्नतीमध्ये आरक्षण त्वरित लागू करावी अशी मागणी यामध्ये लावून धरण्यात येणार आहे.दि.9 जुलै 2025 रोजी बुधवारचा देशव्यापी संप 100 टक्के यशस्वी करावा असे आवाहन संजय मोरे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा