धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याचा समाज उपयोगी उपक्रम.
धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्याचा समाज उपयोगी उपक्रम.
केज
माजी मंत्री मा. धनंजयजी मुंडे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केज तालुक्यात विविध ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरा केला.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. त्यात आपले जेष्ठ सहकारी स्व. आर. टी. जिजा देशमुख यांचे अकाली निधन व एकूण सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही.
माझ्या सहकारी बांधवांना विनंती आहे की, वाढदिवसानिमित्ताने बॅनरबाजी जाहिराती आदींवरील खर्च टाळून त्या ऐवजी सामाजिक उपक्रम राबवावेत. असे धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते.
त्याप्रमाणे वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय केज येथील रुग्णांना व नातेवाईकांना तसेच श्री स्वामी समर्थ वृद्धाश्रम केज येथे फळ, तांदूळ, व ब्लॅंकेट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित रुग्णालयाचे प्रमुख डॉ. केंद्रे साहेब, सारंग भाऊ आंधळे, शंकर बापू तपसे, गहिनीनाथ आप्पा बिक्कड, जालिंदर दळवी, डॉ. उत्तम खोडसे, मालोजी गलांडे, रामभाऊ घुले, अक्षय गीते, प्रीतम खरात, अशोक तपसे, श्रीकांत शिरसाठ, संतोष आंधळे, ईश्वर सारूक, उत्तरेश्वर शिरसाठ व स्वामी समर्थ वृद्धाश्रम चे बापू कराड इतर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा