जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाभाऱ्यास विड्याच्या पानांची सजावट,श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाभाऱ्यास विड्याच्या पानांची सजावट,श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.



केज

केज तालुक्यातील प्रतिदेहु श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

गुरूवर्य महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्यामार्गदर्शना खाली गुरूपोर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाभारा हजारो विड्याच्या पानांनी सजवण्यात आला.

संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरु पौर्णिमेनिमित्त आलेल्या भक्तांनी संत तुकाराम महाराजांच्या दर्शना‌‌ बरोबरच गुरूवर्य महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे आशीर्वाद ही घेतले. याप्रसंगी महंत ह. भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची किर्तन सेवा संपन्न झाली.पावनधाम येथे आलेल्या हजारो भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था सौ.स्मिता चंद्रकांत लोमटे यांनी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल महाराज, अशोक महाराज,जनार्धन महाराज,सिरसट महाराज, प्रशांत महाराज निगडे,गणेश महाराज भगत,शाम महाराज भिसे,गोविंद शिनगारे आणि सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.आणि गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा