जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनीजवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्व्हर मेडल.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनीजवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्व्हर मेडल. 



केज
 

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनीजवळा,शाळेतील इयत्ता दुसरी ते सहावी च्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी एमटीएस आॕलंपियाड -2025 या राज्यस्तरीय परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभाग घेतला होता. यापैकी पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर पाच विद्यार्थ्यांनी सिल्व्हर मेडल मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले आहे.तसेच उर्वरित पंधरा विद्यार्थी ही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.या पदक विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दि.4 जुन रोजी शाळेत आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.हनुमंत गायकवाड आणि प्रमुख अतिथी म्हणून समितीचे उपाध्यक्ष श्री.प्रवीण मस्के तसेच   पी एस आय कु.स्वरूपा नाईकवाडे,दैनिक सामनाचे पत्रकार श्री.सुंदरराव नाईकवाडे यांनी स्थान भूषविले. कार्यक्रमास सर्व शिक्षक विद्यार्थी, गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापक श्री.गुंड सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक  केले.अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्व्हर मेडल सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आले.


 तसेच परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यां बरोबरच त्यांच्या पालकांचाही शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात पीएसआय कु.स्वरूपा नाईकवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पेन आणि चॉकलेट भेट स्वरूपात दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.सावंत सर यांनी तर आभार प्रदर्शनश्रीमती पवार मॅडम यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती नवले मॅडम,गिरी मॅडम, श्री.काळे सर,सांगळे सर, दौंड सर आणि जावळे सर यांनी परिश्रम घेतले.


विद्यार्थ्यांच्या या यशाचे सरपंचसौ.जान्हवीताई गोविंद ससाने, उप सरपंच स्वातीताई दादासाहेब कोकाटे, व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि पत्रकार श्री. दशरथ चौरे यांनी कौतुक केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा