खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तर वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न,विमल बालासाहेब जोगदंड अध्यक्षा स्पिरिट सेवाभावी संस्था, केज यांच्या पुढाकाराने राबवला उपक्रम.
खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तर वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न,विमल बालासाहेब जोगदंड अध्यक्षा स्पिरिट सेवाभावी संस्था, केज यांच्या पुढाकाराने राबवला उपक्रम.
केज
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पिरिट सेवाभावी संस्था, केज यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य व दप्तर वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,केज येथे मोठ्या उत्साहात आणि लोक सहभागातून पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.शिवाजी चौधरी तालुकाध्यक्ष,बजरंग बप्पा मित्रमंडळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.शंकर जाधव तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. शीतलताई लांडगे, नसरीन बागवान, शरीफ सय्यद,युनुस शेख, बालासाहेब गाढवे, दलीलभाई इनामदार, गणेश सावंत, गौसोद्दीन इनामदार, जब्बार भाई, पत्रकार गौतम बचुटे, प्रदीप गायकवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालासाहेब जोगदंड यांनी केले. ढाकणे सर, बासर सर व इनामदार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणा बाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण सिरसट सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मीरा गायकवाड मॅडम आणि वाघमारे सर यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे विमल बालासाहेब जोगदंड अध्यक्षा, स्पिरिट सेवाभावी संस्था, केज यांचा पुढाकार व कुशल नियोजन होते. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण झाल्याने त्यांच्या शिक्षणाला आवश्यक पाठबळ मिळाले असून, पालक व उपस्थित मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा