खा.बजरंग सोनवणेंच्या वाढदिवसानिमीत्त बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणार आरोग्य तपासणी,राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम,जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय अधिक्षकांना पत्र.

खा.बजरंग सोनवणेंच्या वाढदिवसानिमीत्त बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणार आरोग्य तपासणी,राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम,जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकिय अधिक्षकांना पत्र.



बीड


बीडचे खा.बजरंग सोनवणे यांचा वाढदिवस दि.६ जुलै रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे.तालुका स्तरावर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे.दरम्यान,राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्याबाबत डॉ.संजय राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक,जिल्हा रूग्णालय बीड यांनी सर्व वैद्यकिय अधिक्षकांना याबाबत पत्र दिले आहे.राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करयात येते.यामध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील अंगणवाडी मध्ये जाणाऱ्या बालकांची वर्षातून २ वेळा तर शासकीय आणि निम शासकीय शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते.दरम्यान, दि.६ जुलै रोजी खा.बजरंग सोनवणे यांच्या वाढदिवसानिमीत्त संपूर्ण बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीने वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.त्यासाठी शिक्षण विभागाशी संपर्क करण्यात येत असून संबंधीत शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्या बाबत जनजागृती करावी,असेही डॉ.संजय राऊत,जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय,यांनी म्हटले आहे. 

यासाठी तालुका स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. वैद्यकिय अधिक्षक,सर्व जिल्हा/उप जिल्हा/ ग्रामिण रुग्णालय यांना पत्र पाठवून आपल्या अधिनस्त आरबीएसके अंतर्गत सर्व वैद्यकिय पथकांना सज्ज ठेवून आरोग्य तपासणी करावी असे आदेश दिले आहेत.


या कार्यक्रमांचाही समावेश

केज शहर : उपजिल्हा रुग्णालय,केज येथे रुग्णांना साडी वाटप,फळ वाटप,बालाजी मंदिर येथे आरती,दर्गा येथे चादर अर्पण करणे, वयोवृद्ध आश्रम येथे किट वाटप,शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, शेतकरी महिलांचा सन्मान असे विविध कार्यक्रम. 


रक्तदान शिबीर: 

येडेश्वरी कारखाना आनंदगाव सा,आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई, घाटनांदूर,धारूर, वाघोली, सिरसाळा. 

इतर सामाजिक  उपक्रम :  बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात शालेय साहित्य वाटप, फळ वाटप,वृक्षारोपण,फराळाचा कार्यक्रम होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा