रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचे केज तहसीलदार यांना निवेदन सादर.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचे केज तहसीलदार यांना निवेदन सादर.
सन - २०२२ प्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती गण कायम ठेवावेत - दीपक कांबळे
केज
केज तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) शाखेच्यावतीने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, सन २०२२ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या आराखड्यात कोणताही बदल न करता ते कायम ठेवावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन २०२२ मध्ये केज तहसिलदार साहेबांनी जाहीर केलेल्या कृती आराखड्यानुसार होळ जि.प. गण मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे, उमरी पं.स. गणात कोरेगाव, मस्साजोग, लव्हूरी, कानाडी माळी, साबला आणि पिसेगाव या गावांचा समावेश करून त्यालाही मागासवर्गीय राखीव गण म्हणून घोषित करण्यात आले होते. हा आराखडा सर्वसमावेशक व लोकशाही मूल्यांनुसार तयार करण्यात आला होता, त्यामुळे त्यात कोणताही बदल करू नये, अशी रिपाईच्या वतीने स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
या निवेदनाद्वारे पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की,२०२२ शासन निर्णयानुसार अगोदरच एक जिल्हा परिषद गंण आणि दोन पंचायत समिती गण वाढवण्यात आले असून त्यात कोणताही बदल करण्याची गरज नाही तो अगोदरच झालेला असून कोणाच्याही दबावाला बळी न पडता २०२२ प्रमाणे तहसीलदार साहेबाने दिलेला निर्णय कायम ठेवावा, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचा बदल केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
या निवेदनाद्वारे रिपाई कार्यकर्त्यांनी आगामी काळात अन्याय न होता योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी संघर्ष करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा