आदर्श शिक्षक राजेंद्र सोनवणे यांचा सेवा निवृत्ती सोहळा तांबवा येथे उत्साहात संपन्न
आदर्श शिक्षक राजेंद्र सोनवणे यांचा सेवा निवृत्ती सोहळा तांबवा येथे उत्साहात संपन्न.
केज
आदर्श शिक्षक राजेंद्र सोनवणे सर यांचा केज तालुक्यातील तांबवा येथे सेवानिवृत्ती सोहळा अत्यंत उत्साहात आणि स्नेहभावनेत साजरा करण्यात आला.दीर्घकाळ शैक्षणिक सेवेत कार्यरत असलेल्या राजेंद्र सोनवणे सर यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल ३६ वर्षाचा प्रदीर्घ असा शैक्षणिक क्षेत्रातील अभिमानास्पद अन् गौरवास्पद प्रवास प्रामाणिकपणा,सचोटी आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे सहकाऱ्यांमध्ये व समाजात विशेष स्थान निर्माण केले होते.
तांबवा तालुका केज येथील तांबेश्वर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर विद्यार्थीनींनी नृत्य सादर करून सत्कारमूर्तीचे स्वागत केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.संतोष अर्जुनराव कांदे अध्यक्ष,शालेय व्यवस्थापन समिती,तांबवा हे होते प्रमुख पाहूणे म्हणून लक्ष्मणराव बेडस्कर गट शिक्षणाधिकारी, सौ.दिपालीताई अरुण चाटे सरपंच,ग्राम पंचायत तांबवा,मिराताई अनिल चाटे उपसरपंच ग्राम पंचायत तांबवा तसेच मुख्याध्यापक नेहरकर सर,मुख्याध्यापक आश्रुबा सोनवणे सर,चाटे मच्छिंद्र सर,शिंदे मॅडम,गुजर मॅडम,औताडे मॅडम,खरबडे मॅडम, बालासाहेब चाटे सर,चाटे सर,गळगटे सर, माजी नगरसेवक कपिल मस्के,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव कचरू तात्या खळगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश उजगरे दैनिक चंपावती पत्र माजलगाव तालुका प्रतिनिधी महेंद्र मस्के यांच्यासह अनेक सहकारी, मित्र, कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सोनवणे सर यांची मुलगी डॉ.राखी सोनवणे यांनी आपल्या भाषणातून वडिलांचे कौतुक केले.सातवीच्या विद्यार्थीनी पंकजा चाटे,भक्ती चाटे यांनी देखील भाषण केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून राजेंद्र सोनवणे सर यांच्या कार्यपद्धतीचे,शिस्त प्रियतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे मना पासून कौतुक केले. सोनवणे सर यांनी आपल्या उत्तरार्धातील भाषणात सर्व सहकाऱ्यांचे, वरिष्ठांचे व कुटुंबियांचे आभार मानले. त्यांनी सेवानिवृत्ती नंतरही सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन हजारे सर यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिमान मस्के,चाटे दत्तात्रय यांनी केले.स्व मनोगत राजेंद्र सोनवणे सर यांनी केले.या कार्यक्रमास विजय मस्के,किंचक गायकवाड, लक्ष्मण कांबळे,अशोक सोनवणे हे उपस्थित होते.संपूर्ण सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा