बीड जिल्ह्यात काँग्रेस कडून नविन तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर,जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनाही प्रभारी वरून कायम अध्यक्ष केले,आगामी निवडणुकीत काँग्रेस ताकतीने लढण्याचा निर्धार.
बीड जिल्ह्यात काँग्रेस कडून नविन तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर,जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनाही प्रभारी वरून कायम अध्यक्ष केले,आगामी निवडणुकीत काँग्रेस ताकतीने लढण्याचा निर्धार.
केज
बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सर्वच तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून बीड जिल्हा काँग्रेसने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली असल्याचे यावेळी सांगितले.या नियुक्त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा.रजनीताई पाटील यांच्या सूचनेवरून व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोक पाटील,आदित्य पाटील,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे,पशुपतीनाथ दांगट, प्रवीणकुमार शेप,गणेश राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
केज तालुका अध्यक्षपदी श्री.प्रविण लक्ष्मण खोडसे,बीड ग्रामीण श्री.गणेश आसाराम बजगुडे,परळी वैजनाथ ग्रामीण,अॕड.प्रकाश बापूराव मुंडे,परळी वैजनाथ शहर,श्री. हानिफ करीम सय्यद, अंबेजोगाई ग्रामीणश्री.अभिजीत व्यंकटराव लोमटे, आष्टी श्री.फारोक मोहम्मद सय्यद,पाटोदा श्री.राहुल शाहुराव जाधव, माजलगांव श्री.नारायण लक्ष्मण होके पाटील, धारूर श्री.सिध्देश्वर देवराव रणदिवे,गेवराई श्री.महेश गणेश बेद्रे,अंबाजोगाई शहर श्री. मोहमद असिफोद्दीन सइदोद्दीन खतीब बीड शहर श्री.परवेज अहमद बशिरोद्दीन कुरेशी, शिरूर कासार भास्कर बुवासाहेब केदार, माजलगाव शहर अफरोज मुसा तांबोळी, वडवणी ज्ञानेश्वर आबासाहेब आंधळे या प्रमाणे निवडी जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
राज्यात काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने आता प्रत्येक पक्ष बांधणी करत असल्याचे दिसत आहे.काँग्रेसने देखील बीड जिल्ह्यात सर्वच तालुका अध्यक्षांच्या व काही ठिकाणी शहर अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा.सौ. रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा एकनिष्ठ व पक्षाच्या विचारधारेचा आहे.आमच्यावर दिलेली जबाबदारी आम्ही चोखपणे पार पाडू व काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा चांगले दिवस आणू असे मत यावेळी सर्वच तालुका अध्यक्ष यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी माजी मंत्री अशोक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा देऊन पदाचा वापर पक्ष वाढवण्या साठी व पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेला समजावून सांगा.आज ही प्रत्येक गावातील मोठा वर्ग काँग्रेस विचाराचा आहे.आपण त्या लोकांशी संपर्क करा आणि संघटन वाढवा, सर्वसामान्य जनतेच्या कामाला,वेळेला उभे रहा.लोकांचा विश्वास आपल्यावर आहे आपण मोठ्या ताकतीने काम करा व आगामी नगर पालिका, नगर परिषदा, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये आपल्याला उतरायचं आहे त्या अनुषंगाने कामाला लागण्याच्या सूचना देखील यावेळी माजी मंत्री अशोक पाटील यांनी दिल्या.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी देखील सर्व तालुका अध्यक्षांना आप आपली मरगळ झटकून मोठ्या ताकतीने येणाऱ्या निवडणुका लढवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले तसेच पक्ष संघटनाच्या बाबतीत काहीही अडचण असेल तर आम्हाला कळवा. प्रत्येक कामात जिल्हाध्यक्ष तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा