शिष्यवृत्ती परीक्षेत कळमअंबा जिल्हा परिषद शाळेचा डंका,कु.नमिता सर्जेराव वडकरने केज तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून आठवे स्थान मिळविले.
शिष्यवृत्ती परीक्षेत कळमअंबा जिल्हा परिषद शाळेचा डंका,कु.नमिता सर्जेराव वडकरने केज तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून आठवे स्थान मिळविले.
केज
केज तालुक्यातील कळमअंबा येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थी कु.नमिता सर्जेराव वडकरने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून,केज तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्ह्यामध्ये आठवे स्थान मिळवले आहे.पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नमिता ने मोठे यश संपादन केले आहे.मेहनत हीच ओळख,यश त्याचीच शान, गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेला कधीही मिळतो मान अशी गुणवंत विद्यार्थी कुमारी नमिता हिने मोठे यश संपादन केले आहे.अगदी ग्रामीण भागातून शिक्षण घेणाऱ्या मुली पुढे जाताना आपण पाहत आहोत.हे मोठे यश संपादन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व तसेच सरपंच शशिकांत इंगळे उपसरपंच,दिगंबर वाघमारे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधवराव इंगळे व गावातील नागरिकां कडून शुभेच्छा दिल्या.दि.१२ जूलै रोजी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा