केज येथील ठाकूर रामकृष्ण परमहंस परिवाराचा गुरुपोर्णिमा उत्सव आनंदात संपन्न, अज्ञानाच्या 'अ' पासून आश्चर्याच्या 'आ' पर्यंत घेवून जाण्याचं काम सद्गुरु करतात - ह.भ.प. समाधान

केज येथील ठाकूर रामकृष्ण परमहंस परिवाराचा गुरुपोर्णिमा उत्सव आनंदात संपन्न, अज्ञानाच्या 'अ' पासून आश्चर्याच्या 'आ' पर्यंत घेवून जाण्याचं काम सद्गुरु करतात - ह.भ.प. समाधान महाराज शर्मा.


केज

                   

केज येथील प.पू.वै.वासुदेवराव खंदारे गुरुजी यांच्या कृपा आशिर्वादाने चालत असलेला गुरुपोर्णिमा उत्सव यावर्षी देखील विठाई मंगल कार्यालय केज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी वै.वासुदेवराव खंदारे गुरुजींच्या वृंदावनधाम या निवासस्थानी ठाकुर रामकृष्ण परमहंस,शारदा माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व नंतर वृंदावन धाम येथून प.पू.वै.वासुदेवराव खंदारे गुरुजींच्या पादुका पालखी मध्ये ठेवून विठाई मंगल कार्यालया पर्यंत पायी दिंडी काढण्यात आली.या कार्यक्रमस्थळी वै.प.पु.वासुदेवराव खंदारे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुरुमाई खंदारे आईंची पाद्य पुजा करण्यात आली.यावेळी जेष्ठ गुरु बंधु ह.भ.प.भावरत्न गुरुदास समाधान महाराज शर्मा यांनी गुरुजींनी सर्व साधकांना दिलेली ध्यान,प्राणायाम साधना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच ध्यान,प्राणायाम साधनेने जीवनात कसे अमुलाग्र बदल होतात हे सांगितले व गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला.तसेच यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील स.भु.महा विद्यालयाचे प्राचार्य विवेक मिरगणे सर,सौ. दिपाताई काटे व उत्रेश्वर जाधव यांनी गुरुजींनी दिलेल्या ध्यान साधने विषयी अनुभव कथन केले.


यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील प.पु.वै. वासुदेवराव खंदारे गुरुजींचे शिष्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सर्व शिष्य साधकांना प.पु.वै.वासुदेवराव खंदारे गुरुजींनी दिलेली ध्यान साधना रोज न चुकता करावी यासाठी भावरत्न गुरुदास ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांनी साधकांना शपथ दिली.या कार्यक्रमात दिंडीत सहभागी साधकांचा दिव्य रिंगण सोहळा पार पडला.सर्व ध्यान प्राणायाम साधकांनी गुरुस्मरण करून गुरु पोर्णिमा सोहळा महा प्रसाद घेऊन संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा