केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत.
केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत.
केज
ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी सन २०२५ - २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षणाची सोडत दिनांक १५ जुलै (मंगळवार) २०२५ रोजी केज तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली.या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना विशेष संधी देण्यात आली आहे.
या आरक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ग्रामपंचायतीं पैकी प्रत्येक प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणाचे गावनिहाय वितरण पुढीलप्रमाणे आहे.
अनुसूचित जाती (एस. सी)महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती :
मांगवडगाव,इस्थळ,मोटेगाव,साळेगाव,हनुमंत पिंप्री, मस्साजोग,लाखा,बोरीसावरगाव, सादोळा.
सर्वसाधारण (एस. सी.खुला) प्रवर्गासाठी : सारुळ,कोल्हेवाडी,धनेगाव,सौंदना,उंदरी, वरपगाव/कापरेवाडी,जवळबन,सोनिजवळा, लव्हूरी
अनुसूचित जमाती (एस. टी)महिलांसाठी आरक्षित: ढाकेफळ
सर्वसाधारण प्रवर्गासाठी: धोतरा
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी) महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायत :
जोला,मुलेगाव,पिसेगाव,पिटीघाट,शेलगाव गांजी,सातेफळ,लिंबाचीवाडी,केकान वाडी, सोनेसांगवी,येवता,रामेश्वरवाडी/ढाकनवाडी, कौडगाव,पाथरा,सावळेश्वर,बोबडेवाडी, नांदुरघाट.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण प्रवर्गासाठी(ओ.बी.सी) :
आरणगाव,भाटुंबा,भोपला,दरडवाडी,डोका, काशीदवाडी,शिंदी,चिंचोलीमाळी,नाव्होली, लाडेवडगाव, पैठण,दहिफळ (वड),माळेगाव, बावची.
सर्वसाधारण प्रवर्ग (ओपन)महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती :
लाडेगाव,कानडी माळी,कोठी,बोरगाव बुद्रुक, तरनळी,काळेगाव घाट,बनसारोळा,भालगाव, विडा/गौरवाडी,कासारी,आवसगाव/वाकडी, पिंपळगव्हाण,हदगाव,माळेवाडी,दिपेवडगाव, कानडीबदन,कुंभेफळ,सुकळी,वाघेबाभळगाव, बानेगाव,नागझरी,सासुरा,डोनगाव,मुंडेवाडी, पिराचीवाडी,दैठणा,केकत सारणी,कोरेगाव, पळसखेडा,शिरपुरा,उमरी.
खुल्या ( ओपन) प्रवर्गासाठी:
गोटेगाव,जाधव जवळा,साबला,युसुफवडगाव, होळ,बनकरंजा,एकुरका,तांबवा,आनंदगाव, केवड,सारणी आनंदगाव,सूर्डी,शिरूर घाट/गदळेवाडी,औरंगपूर,चंदन सावरगाव,केळगाव /बेलगाव,जानेगाव,धर्माळा,देवगाव, कोरडेवाडी,आनेगाव,राजेगाव,टाकळी,सांगवी (सा),आंधळेवाडी,जिवाची वाडी/तुकुचीवाडी, घाटेवाडी,नारेवाडी,आडस,सांरणी (आ), नायगाव इत्यादी ग्रामपंचायती असून आरक्षणा ची ही प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार पारदर्शक आणि संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीच्या माध्यमातून पार पडली.ग्रामीण भागातील महिलांना नेतृत्व संधी देणारे हे आरक्षण भविष्यातील ग्रामविकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा