तांबवा शिवारातुन शेतकऱ्याच्या सोलार पॅनलची चोरी, केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल.

तांबवा शिवारातुन शेतकऱ्याच्या सोलार पॅनलची चोरी, केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल.



केज


तांबवा शिवारातील शेतकऱ्याच्या शेतामधील सोलर पॅनलची अज्ञात चोरट्याने चोरी केली असून या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे तांबवा येथील शेतकरी महेश मोहनराव सत्वधर राहणार समर्थ नगर, केज तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवासी असून त्यांचे शेत तांबवा शिवारामध्ये सर्वे नंबर 190/2 मध्ये आहे. त्यांच्या शेतामध्ये दिनांक 03/07/2025 रोजी महाराष्ट्र शासना तर्फे शेतकऱ्यांसाठी अनुदानित 3 एच पी सोलार पंप बसवण्यात आला होता. दररोज प्रमाणे ते शेतामध्ये गेले  असता त्यावेळी त्यांना असे लक्षात आले की,  इन्स्टॉल केलेले तीन एच पी सोलर मोटरचे सहापैकी तीन सोलर पॅनल जागेवरती नाहीत त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता असे लक्षात आले की, शेतामधील आणखीन पेरणी यंत्र म्हणजे टोकन मशीन हे देखील नव्हती. तसेच सदर शेतकऱ्यांने पोलीस स्टेशन केज येथे तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिस करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा