चिंचोलीमाळी येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन,२३ जुलै २०२५ रोजी होणार महाप्रसादाने सांगता ; संगीतमय भारुडाची मिळणार खास मेजवानी
चिंचोलीमाळी येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन,२३ जुलै २०२५ रोजी होणार महाप्रसादाने सांगता ; संगीतमय भारुडाची मिळणार खास मेजवानी.
केज
श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मौजे चिंचोली माळी ता. केज जि. बीड येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत सावता महाराज चरित्र ग्रंथ वाचन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.यंदाचे हे सप्ताहाचे ११ वे वर्ष असून, चिंचोली माळी गावाचे श्रद्धास्थान स्व.महंत ह.भ.प.रामकृष्ण महाराज वरपगावकर यांच्या स्मरणार्थ भक्तिभावाने साजरा होणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात बुधवार दि.१६ जुलै २०२५(आषाढ कृष्ण ६) रोजी होणार असून, सांगता बुधवार दि.२३ जुलै २०२५ (आषाढ कृष्ण १४) रोजी महाप्रसादाने होणार आहे. दररोज रात्री ८.०० वाजता श्री संत सावता महाराज जीवन चरित्र कथा वाचन होणार असून, विविध भागातील कीर्तनकार आपली किर्तन सेवा सादर करणार आहेत.दि.१६ जुलै रोजी ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे, दि.१७ जुलै रोजी ह.भ.प.महादेव महाराज राऊत,दि.१८ जुलै रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज,दि.१९ जुलै रोजी ह.भ.प. प्रकाश महाराज साठे,दि.२० जुलै रोजी ह.भ.प.सुमंत महाराज डाके,दि.२१ जुलै रोजी ह.भ.प. प्रणिताताई गवारे,दि.२२ जुलै रोजी ह.भ.प.अक्रुर महाराज साखरे,दि.२३ जुलै रोजी ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री शिवराम पुरी मठ संस्थान,वरपगांव यांचे किर्तन होणार आहे.या सप्ताहातील खास कार्यक्रम रविवार दि.२० जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० ते १२.३० या वेळेत आळंदी देवाची,पुणे येथील भारुड सम्राट ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड यांचे सोंगी सांप्रदायिक भारुड सादर होणार आहे.
बुधवार,दि.२३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर गावातील सर्व भाविकांसाठी महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहामध्ये संगीत व मृदंग वादनातील सहभागामध्ये संगीत विशारद ह.भ.प.सुमंत महाराज डाके,बाळु महाराज कोरडे हे उपस्थित राहणार आहेत तर गायनाचार्य संगीत अलंकार ह.भ.प. वैभव महाराज फुल झळके,तसेच मृदंगाचार्य ह.भ.प.विलास महाराज कोरडे माजलगाव हे उपस्थिती लावणार आहेत.या अखंड हरिनाम सप्ताहा च्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि सेवा गावातील कार्यकर्ते करत असून सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा