संपूर्ण ग्रामविकास हेच वसंतराव नाईक यांचे स्वप्न -डॉ.हनुमंत सौदागर


संपूर्ण ग्रामविकास हेच वसंतराव नाईक यांचे स्वप्न -डॉ.हनुमंत सौदागर 



केज


महाराष्ट्र प्रदेश मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात वसलेला असून जोपर्यंत गावचा विकास होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होणार नाही.म्हणूनच संपूर्ण ग्रामविकास हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जलनायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले.ते भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय केज येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्राचार्य विजय शिनगारे,डॉ.नागेश कराळे,ग्रंथपाल अशोक घोडके,श्रीकांत लुंगारे,श्री.सुजित नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ.कराळे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राच्या कृषीचा अत्यंत सखोल अभ्यास असणारे आणि त्या दृष्टीने जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे कृतीशील सुधारक म्हणजे वसंतराव नाईक हे असल्याचे सांगितले.यावेळी प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा