बीड लोकसभा मतदार संघांचे पालकत्व स्विकारल्याने मोठी जबाबदारी, चिंचोली माळी व विडा जिल्हा परिषद सर्कलचे उपकार जन्मभर विसरणार नाही - खा.बजरंग सोनवणे.
बीड लोकसभा मतदार संघांचे पालकत्व स्विकारल्याने मोठी जबाबदारी, चिंचोली माळी व विडा जिल्हा परिषद सर्कलचे उपकार जन्मभर विसरणार नाही - खा.बजरंग सोनवणे.
पत्रकार अनिल गलांडे यांच्या श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा खा.बजरंग सोनवणे यांच्या शुभहस्ते संपन्न.
केज
बीड लोकसभा मतदार संघाचे पालकत्व स्विकारले आहे त्यामुळे मोठी जबाबदारी आहे.त्यामुळे संपर्कासाठी वेळ मिळत नाही परंतु चिंचोलीमाळी व विडा जिल्हा परिषद सर्कलचे उपकार जन्मभर विसरणार नाही कारण मला या सर्कल मधुन सातत्याने मताधिक्य दिले असून जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे असे खा.बजरंग सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले ते पत्रकार अनिल गलांडे यांच्या श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.शनिवार दि.०७ जून २०२५ रोजी चिंचोली माळी ता.केज जि.बीड येथे श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचा शुभारंभ खा.बजरंग सोनवणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बीड जिल्ह्याचे खासदार श्री.बजरंग सोनवणे हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ.रोहिणीताई सुनील देशमुख सरपंच चिंचोलीमाळी या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.सौ.संगिताताई ठोंबरे, सौ.मनिषाताई कुपकर,गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर,ह.भ.प.भगवान महाराज शास्त्री,ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज गिरी, पोलिस निरीक्षक वैभव पाटील,शिवाजी दादा ठोंबरे,भाई मोहन गुंड,गोविंद नाना शिनगारे, अरविंद थोरात,चत्रभुज खोडसे,पिंटु ठोंबरे,भाऊसाहेब गुंड,बाळासाहेब गाढवे सौ.शितलताई लांडगे,ज्ञानेश्वर चवरे,ह.भ.प. सुनील महाराज गालफाडे,बापुसाहेब भुसारी, शिवाजी चाटे, मंजुलदास भिसे,नितीन सुरवसे, गणेश सत्वधर,संदिप जोशी,आबा महाराज मेहरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते नुतन इमारतीची फित कापून उद्घाटन संपन्न झाले.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी समस्त गावकरी मंडळी,मित्र परिवार,पत्रकार, विविध शिक्षण संस्था चालक,कॉम्प्युटर संस्था चालक व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.प्रमुख पाहुणे यांनी श्री संस्कार इंग्लिश स्कूलच्या सर्व टीमला शुभेच्छादिल्या.
सुरसंगम कला पथक यांनी उत्कृष्ट गितांचे सादरीकरण अनिल वैरागे,स्नेहलताई यांनी केले.यावेळी बप्पा चंदनशिव,दिलीप तात्या देशमुख,अरुण काळे,शिवाजी गायकवाड, शहाजी अप्पा गलांडे,भुजंग गलांडे,चंद्रकांत भुजबळ,धिरज वनवे,रामराजे नखाते,गुलाब पठाण,अनिल राऊत,सचिन राऊत,रविराज कापरे,रामदास सपाटे,प्रमोद नखाते पत्रकार चंद्रकांत पाटील,रविंद मेटे,जोतिराम सावंत, सचिन साखरे,पांडुरंग कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शिक्षीका पुजा देशमुख,सोनाली खंदारे, निलम जोगदंड,रेश्मा गायकवाड,प्रियंका शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनिल गलांडे केले तर आभार प्रदर्शन प्रिन्सिपल सिमा काळे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा