माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण
माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण
केज
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा माऊली विद्यापीठ केज चे संस्थापक अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त माऊली विद्यापीठातील विविध विद्याशाखा परिसरात वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमाने जन्मदिवस साजरा करण्यात आला.
महिला महाविद्यालय बीड, प्रमिला देवी पाटील महाविद्यालय नेकनूर, सरस्वती महाविद्यालय केज,रामराव पाटील माध्यमिक विद्यालय केज,सरस्वती कन्या प्रशाला, भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय,महाविद्यालय परिसरात फळांची रोपांची लागवड करण्यात आली. माऊली विद्यापीठाचेप्रशासकीय अधिकारी श्री.प्रताप मोरे यांच्या नियोजनाखाली कार्यक्रम घेण्यात आले.
प्राचार्य विजय शिनगारे,प्राचार्य डॉ.जी.बी. पाटील,प्राचार्य डॉ.ढास, डॉ.हनुमंत सौदागर, मुख्याध्यापक श्री.गोरे, मुख्याध्यापिका सविता घुले,मुख्याध्यापक श्री. खोसे, मुख्याध्यापक राम कांबळे,सहशिक्षक विलास भिसे, मुख्याध्यापक संदीप सत्वधर आदींच्या नियोजनातून उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा