सोनिजवळा येथील गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी सरपंच पुढे,पिकावर पाणी सोडुन स्वतःच्या शेती तुन गावांमध्ये केला पाणीपुरवठा

सोनिजवळा येथील गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी सरपंच पुढे,पिकावर पाणी सोडुन स्वतःच्या शेती तुन गावांमध्ये केला पाणीपुरवठा



केज 


केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंचाने स्वःता च्या शेतीला पाणी न देता गावासाठी तीन किलो मीटर अंतरावरून गावाची तहान भागवली या बाबत सविस्तर वृत्त असे की,केज तालुक्या तील सोनिजवळायेथील सरपंच गोविंद ससाणे यांनी एप्रिल महिन्या पासून आज पर्यंत स्वःताच्या शेतीला पाणी न देता गावासाठी शेतातुश पाणी आणले, भर उन्हाळ्यात गावाला पाणी नाही बारा गावा साठी पाणी पुरवठा करणारी धनेगाव पाणी पुरवठा योजना सतत बंद पडत असल्याने गावातील लोकांचे होत असलेले हाल पाहावले नाही आणि शेती मध्ये कुठलेही पिक न घेता गावासाठी पाणी उपलब्ध करुन दिले, विहीरीने गाठलेला तळ, आटलेले हातपंप त्यामुळे निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई गावकऱ्यांचे पाण्यासाठी होत असलेले हाल बघुन सरपंचांनी पुढाकार घेतला आणि आपल्या शेतातील पिक वाळवुन शेतातील पिकांचे नुकसान करुन शेतातील विहिरीचे व बोरचे पाणी गावकऱ्यांना उपलब्ध करुन दिले यामुळे पंच क्रोशीतील नागरिकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

केज शहरा पासून जवळच असलेल्या सोनिजवळा या गावात धनेगावयेथुन पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन जिर्णझाली असल्याने शासनाने जवळबन येथुन जल जीवन मिशन योजना सोनिजवळा गावांसाठी गेल्या दोन वर्षांपासून राबवली जात आहे. परंतु निगरगट्टअधिकारी व गेंड्याच्या कातडी पांघरलेला गुत्तेदार यांच्या हलगर्जीपणा मुळे अजुन दोन वर्षे तरी गावाला पाण्या साठी भटकंती करावी लागेल याचा विचार करून सरपंच गोविंद ससाणे व त्यांच्या कुटुंबियांनी गावासाठी शेतातील पिकांचे नुकसान डोळ्यासमोर दिसत असताना देखील पाइपलाइनच्या माध्यमा तून गावांसाठी पोहचले आहे.शेतातील उन्हाळी पिके वाळूनगेली आहेत सरपंच गोविंद ससाणे यांना मानवतेची, माणुसकीची आणि आपुलकीची जाणीव असल्याने विहीर अधिग्रहण न करता किंवा पाण्याचा कोणताही मोबदला आपल्याला नको अशी भुमिका त्यांनी घेतली. विहीरी सोबतच स्वःताचा मोटार पंप पाइपलाइन आणि विज उपलब्ध करुन दिली आहे,गावच्या पाण्याचा प्रश्न पाहुन आपण विना मोबदला विहीरीचेपाणी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे 

१) सोनिजवळा येथे गेल्या तीन महिन्यां पासून सरपंच गोविंद ससाणे यांनी स्वःताच्या शेतातील विहिरीचेपाणी तीन किलोमीटर अंतरा वरून गावाला पोहचले आहे व गावची तहान भागवली आहे गावात चार कोटी तेरा लाख रुपयांचे शासनाच्याजल जीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे परंतु ते अजुन दोन वर्षे तरी गावाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल असे वाटत नाही. त्यामुळे मी सरपंच आसेल किंवा नसेल माझ्या शेतातील विहिरीचे पाणी गावांसाठी कमी पडु देणार नाही मी कुठलेही शेतात पिक घेणार नाही पण गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करु देणार नाही.गावात म्हसोबा देवस्थान परीसरात व हनुमान मंदिर परिसरात दोन ठिकाणी पाणी उपलब्ध करुन दिले आहे.असे सरपंच गोविंद ससाणे सोनिजवळा यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा