भविष्यात बीड जिल्ह्याची ओळख एक आदर्श जिल्हा म्हणून झाली पाहिजे - माजी आमदार अँड उषाताई दराडे.

भविष्यात बीड जिल्ह्याची ओळख एक आदर्श जिल्हा म्हणून झाली पाहिजे - माजी आमदार अँड उषाताई दराडे.

पुरस्कार प्राप्त आणि निवड झालेल्या पत्रकारांचा दराडे कुटुंबियांच्या वतीने यथोचित सत्कार संपन्न.



बीड 

 

बीड जिल्हा हा पुरोगामी आणि डाव्या विचार सरणीचा जिल्हा आहे.उगीच होत असलेली बदनामी आता थांबवणे गरजेचे आहे.बीड जिल्ह्यात कधीही जातीवाद नव्हता मागील काही दिवसात जी काही विषवल्लींनी पेरली आहे, त्यामुळे बीड जिल्ह्याची नाहक बदनामी मोठ्या प्रमाणावर झाल्याने बीड मधील रहिवासी असलेल्या व्यक्तींना पर जिल्ह्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

भविष्यात ही परिस्थिती बदलण्यासाठी आता प्रत्येकांनीच जबाबदारीने पावले उचलणे गरजेचे आहे.


त्यामुळेच मी बीड जिल्ह्यात विविध क्षेत्रांमध्ये चांगली गुणी लोक आहेत. त्यापैकी सर्वप्रथम मी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये असलेल्या गुणवंतांचा सत्कार करून सुरुवात करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माजी आमदार अँड उषाताई दराडे यांनी व्यक्त केले.बीड येथील उषा निवासस्थानी माजी आमदार अँड. उषाताई दराडे परिवाराच्या वतीने पत्रकारांचा कौटुंबिक सत्कार सोहळा रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


यावेळी जेष्ठ विधीज्ञ अँड.मोतीरामजी दराडे तसेच पोस्कोच्या जिल्हा सरकारी वकील अँड.मंजुषाताई दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकारांचा गुण गौरव सोहळा संपन्न झाला.शाल,पुस्तक आणि मोगऱ्याचे सुंदर झाड भेट देऊन पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.


यामध्ये पत्रकार संघाच्या प्रदेश संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल वैभव स्वामी तसेच राज्यपालांच्या शुभहस्ते वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त पत्रकार दैनिक दिव्य मराठीचे अमोल मुळे,ऑरगॅनिक शेतीनिष्ठ युवा शेतकरी शिवराम घोडके या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आमेर हुसेन यांना जय महाराष्ट्र न्यूज चैनल मध्ये तर हरिदास तावरे यांना लोकशाही न्यूज चॅनेल मध्ये आणि आकाश सावंत यांना एनडीटीवी न्यूज चैनल मध्ये नव्याने काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.


यानंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी अमजद खान,तसेच जिल्हा सर चिटणीसपदी शेख वसीम,महिला जिल्हाध्यक्ष पदी शेख आयेशा,महिला सरचिटणीसपदी प्रा. अनुप्रिता मोरे,जिल्हा संघटक पदी रईस खान, जिल्हा उपाध्यक्षपदी शेख आयुब,तसेच उपाध्यक्षपदी अमोल शिंदे आणि दत्ता काटे यांची निवड झाल्याबद्दल दराडे कुटुंबाच्या वतीने शाल पुस्तक आणि मोगऱ्याचे सुंदर झाड भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा