केज ग्रीन सिटी साठी आज बैठकीचे आयोजन,वृक्षप्रेमी नागरिकांना उपस्थित रहाण्यासाठी आवाहन
केज ग्रीन सिटी साठी आज बैठकीचे आयोजन,वृक्षप्रेमी नागरिकांना उपस्थित रहाण्यासाठी आवाहन
केज
सध्या केज शहर दोन महामार्गाच्या जोडणी वर आहे.मात्र या महा मार्गाच्या कडेने विस्तारित शहर अंतर्गत भागात झाडे नाहीत. अगोदर असणारी थोडी फार झाडेही रस्ता कामा निमित्त तोडण्यात आली आहेत.एकेकाळी केज शहरात वडाची विशाल झाडे अस्तित्वात होती.
राज्यातील अनेक शहरांनी वृक्षारोपण करून झाडे वाढवली आहेत.त्यामुळे पर्यावरणपूरक वातावरण बनून लोकांना आनंद मिळत आहे.केज शहरातील रस्त्यावर झाडे नाहीत. हिरवीगार झाडी शहराचे वैभव असते.त्यावरच शहराची प्रतिष्ठा व मूल्ये तयार होतात.पुढील पिढीसाठी ते एकभूषण असते.यासाठी कोणाला तरी योगदान द्यावे लागते.म्हणून 'केज ग्रीन सिटी' चळवळ राबवण्याचा आम्ही संकल्प केला आहे. यासाठी मदतीचे असंख्य हात हवे आहेत.
केज शहर व तालुक्यातील पर्यावरण व वृक्ष प्रेमी युवक-युवती व नागरिकांना आम्ही या कार्यासाठी हाक देत आहोत.यासाठीची व्यापक बैठक बुधवार दि.४ जून २०२५ रोजी दुपारी ठीक ३ वाजता शासकीय विश्रामगृह केज येथे आयोजित केली आहे.तरी आपण या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन "केज ग्रीन सिटी ग्रुप" (केजीसीजी)च्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 9423733888 व 077094 42730, 90118 02982, 94041 00199 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा