साबला येथे नवनियुक्त महिला कर्मचारी यांचा सन्मान सोहळा संपन्न
साबला येथे नवनियुक्त महिला कर्मचारी यांचा सन्मान सोहळा संपन्न
केज
केज तालुक्यातील साबला ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नवनियुक्त पोलिस कॉन्स्टेबल काकडे वैशाली भगिरथ,अंगणवाडी शिक्षिका काकडे शिवकांता अजय,अंगणवाडी मदतनिस मुळे शोभा अमोल यांचा सन्मान सरपंच जनाबाई नरहरी काकडे,उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे,सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,एआरटी संस्था, यवतमाळ प्रकल्प व्यवस्थापक वली तांबोळी, प्रकल्प सहाय्यक ज्योती सांबरे,प्रदिप दहिरे या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच काकडे वैशाली यांनी गरिब परिस्थितीवर मात करून शालेय प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतले.वैशालीच्या मना मध्ये एक जिद्ध आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे ते वैशालीने पूर्ण करून दाखवले. सत्कार स्विकारत असताना त्यांनी असे म्हटले की, गावातील मुलींनी,मुलांनी शालेय शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी.जर नोकरी नाही लागली तर एखादा उद्योग व्यवसाय निवडावा आणि आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावा.आभार प्रदर्शन नंतर हा कार्यक्रम संपन्न झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा