ग्रामविकास अधिकारी के.के.आगाशे यांचा निरोप समारंभ संपन्न, के.के.आगाशे साहेब यांच्यासारखे ग्रामविकास अधिकारी, गावकऱ्यांच्या सेवेसाठी नशिबाने मिळतात - सरपंच नंदकुमार मिसाळ

ग्रामविकास अधिकारी के.के.आगाशे यांचा निरोप समारंभ संपन्न, 

के.के.आगाशे साहेब यांच्यासारखे ग्रामविकास अधिकारी, गावकऱ्यांच्या सेवेसाठी नशिबाने मिळतात - सरपंच नंदकुमार मिसाळ

केज


केज तालुक्यातील मौजे कोल्हेवाडी येथील ग्राम विकास अधिकारी श्री. काकासाहेब कोंडीबा आगाशे हे दि.६ जून रोजी बदली झाल्याने पदमुक्त झाले आहेत. के.के.आगाशे हे कोल्हेवाडी ग्रामपंचायत येथे गेली दीड वर्षा पासून कार्यरत होते. तरी त्यांच्या जागी श्री. शंकर लक्ष्मण हेडगिरे यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.कर्तव्यदक्ष व प्रेमळ स्वभाव ही त्यांची ख्याती आहे.सदैव आपल्या कार्याशी तत्परता,कार्यात एकाग्रता,ग्रामस्थांच्या मदतीला सदैव उपलब्ध असणारा अधिकारी म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे.एक शासकीय अधिकारी कसा असावा याचे उदाहरण कोणाला द्यायचे झाले तर के.के. आगाशे यांचे द्यावे लागेल.सेवेच्या आपल्या दीड वर्षात कुठलेही कारण न देता कायम कर्तव्यावर हजर असलेले के.के.आगाशे अनेक शासकीय सेवा करणारांसाठी आदर्श  ठरणारे आहेत.त्यांनी आपले कार्य प्रामाणिक पणे पार पाडले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्या बद्दल दि.६ जुन २०२५ रोजी शुक्रवारी त्यांचा सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी,कर्मचारी व गावकऱ्यांच्या वतीने शाल,श्रीफळ,हार देऊन सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच नवनियुक्त ग्रामविकास अधिकारी श्री.शंकर हेडगीरे यांचे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई