आव्हाड एज्युकेशनल अकादमी ची कु.गौरी ससाणे ची इस्त्रोच्या अभ्यास सहलीसाठी निवड

आव्हाड एज्युकेशनल अकादमी ची कु.गौरी ससाणे ची इस्त्रोच्या अभ्यास सहलीसाठी निवड.



केज


केज शहरातील आव्हाड एज्युकेशनल अकादमी ची इयत्ता ७ वी ची विद्यार्थिनी कु.गौरी दादासाहेब ससाणे,शारदा इंग्लिश स्कूल केज येथे घेण्यात आलेल्या सी.व्ही.रमन बालवैज्ञानिक परीक्षेत जिल्ह्यातून चौथी आली आहे.


त्यामुळे तिची इंडियन स्पेस रिसर्च सेंटर (इस्रो) च्या अभ्यास सहली साठी निवड झाली आहे.कु.गौरी दादासाहेब ससाणे हीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.कु.गौरी दादासाहेब ससाणे ही सोनिजवळा या ग्रामीण भागातील विद्यार्थीनी असुन शिवसेना केज विधानसभा प्रमुख श्री.दादासाहेब ससाणे यांची कन्या आहे.आव्हाड एज्युकेशनल अकादमीचे संचालक डॉ.विठ्ठल आव्हाड सर व आव्हाड एज्युकेशनल अकादमीच्या संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई