नायगांव ते इस्थळ रस्त्याची झाली चाळणी प्रवाशीत्रस्त,रखडलेल्या रस्ते कामासाठी ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात
नायगांव ते इस्थळ रस्त्याची झाली चाळणी प्रवाशीत्रस्त,रखडलेल्या रस्ते कामासाठी ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात.
केज
केजतालुक्यातील अनेक रस्त्यांची सुधारणा होत असताना काही रस्त्यांची मात्र दुरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी होणारी कामे हीअडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील मौजे नायगांव ते इस्थळ या रस्त्याची पूर्णतः चाळणी झालेली असून त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे.त्यात नायगाव ते सौंदना या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे.गुत्तेदाराने त्या रस्त्याचे बी.बी.एम पर्यंतचे काम करून सोडून दिले आहे.काही ठिकाणी तर काम होण्या अगोदरच गुडघा भर खड्डे पडले आहेत. बी.बी.एम करून सोडल्याने रस्त्यावरील खडी उघडी पडल्याने प्रवास करताना प्रवास करताना चांगलीच दमछाक होत आहे.
तसेच सौंदना ते इस्थळ हा रस्ता म्हणजेखड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे.अनेक वर्षापासून हा रस्ता याच अवस्थेत आहे.या खड्डेमय रस्त्या वरून जातानातारेवरची कसरत करावी लागत आहे.
नायगाव ते इस्थळ या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण न झाल्यास रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी सौंदना, नायगाव येथील ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात असल्याचे ग्रामस्थांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा