स्वानंद सार्वजनिक वाचनालय व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण मध्ये छ.शिवाजी महाराज राज्यभिषेक दिन सोहळा व जागतिक पर्यावरण दिन साजरा.

स्वानंद सार्वजनिक वाचनालय व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण मध्ये छ.शिवाजी महाराज राज्यभिषेक दिन सोहळा व जागतिक पर्यावरण दिन साजरा.



केज


स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज.जि.बीड व आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज.जि.बीड यांच्या संयुक्तविद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा व जागतिक पर्यावरण दिन विविध सांस्कृतिक,सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

दिनांक ६ जुन २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा व्याख्यान व चर्चासत्र कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला.

प्रमुख व्याख्याते म्हणून ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ समाज सेवक,जेष्ठ विचारवंत, ख्यातनाम वक्ते, व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड व एस. के.वैरागे यांचे व्याख्यान झाले.छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व जगविख्यात असल्याचे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची उंची जगात कोणालाही गाठता आली नाही असे प्रतिपादन एस.के.वैरागे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, माणिकराव गायकवाड, पांडुरंग गावदवाड यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय सोनवणे, कमलाकर साबळे, बाळासाहेब घोगले, रावसाहेब जाधव, दादासाहेब गायकवाड, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप रंगनाथ गायकवाड यांनी केला.

दिनांक ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व्याख्यान व परिसंवाद कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला.प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड यांचे व्याख्यान व मार्गदर्शन झाले.अध्यक्ष स्थानी रावसाहेब जाधव हे होते.यावेळी बाळासाहेब गायकवाड, आनंद भैय्या गायकवाड संजय सोनवणे यांनीही उपस्थित राहून मार्ग दर्शन केले.दोन्ही कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन,आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे व संस्थेचे विश्वस्त आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई