केज येथील बस स्थानकामध्ये एसटीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

केज येथील बस स्थानकामध्ये एसटीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा.


केज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन केज येथील बस स्थानकामध्ये दि.१ जून रोजी साजरा करण्यात आला. आगारप्रमुख धारूर एन.एम.चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली केज येथे साजरा करण्यात आला.


वाहतूक निरीक्षक मंगेश मोदी, सामाजिक कार्यकर्ते डॉ.हनुमंत सौदागर, विक्रम डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय लेखाधिकारी तथा पालक अधिकारी नारायण मुंडे,वाहतूक नियंत्रक आनंत लोंढे,अतिक अन्सारी,लिपिक राजेभाऊ शिंदे,वाहक अनिल क्षीरसागर बसचे चालक संजय दहीफळे वाहक नितीन कोठावळे यांचे स्वागत करण्यात आले.एसटी चा प्रवास हा सुरक्षित प्रवास असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत धारूर - अमरावती बसची पूजा करून प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.प्रवाशांची अविरत सेवा करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई