खत बि-बियाणाचा तुटवडा दाखवून आधीक पैसे मागितले तर खबरदार तक्रार आली तर त्याची गय करणार नाही - भाई मोहन गुंड

खत बि-बियाणाचा तुटवडा दाखवून आधीक पैसे मागितले  तर खबरदार तक्रार आली तर त्याची गय करणार नाही - भाई मोहन गुंड.




केज


खरीप पेरणीची लगबग सुरु झालीआहे. शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी लगबग करत आहेत, यापूर्वी अनेक बियाणे बोगस निघाले आहेत,  बियाणे पेरले तर ते उगवलेच नाही सावधगिरी म्हणून, खत बी-बियाणे घेताना शेतकऱ्यांनी पक्क्या पावत्या कृषी दुकानदाराकडून घ्याव्यात असे आवाहन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी केले आहे. 

मागील वर्षी खताचा तुटवडा दाखवून बेसुमार भावाने खत विक्री केल्याच्या घटना समोर आल्या होत्या,यावर्षी ही अनेक शेतकऱ्यांनी अनेक कृषी दुकानदाराच्या तक्रारी माझ्याकडे फोन द्वारे केलेल्या आहेत, मी दोन दिवसात जिल्हा कृषी अधिकाऱ्याची भेट घेणार आहे, मागील वर्षी सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली होती. 

पावत्या नसल्यामुळे कृषी दुकानदार नंतर शेतकऱ्याला बोलू देत नाहीत, म्हणून शेतकऱ्यांनी कृषी दुकानदाराकडून पक्की पावती घेतल्याशिवाय खत बी बियाणे खरेदीच करू नये,खत बियाण्या च्या एमआरपी पेक्षा अधिक पैसे कोणाला ही देऊ नयेत कोणी खत बी-बियाण्याचा तुटवडा करीत असेल, अधिक पैसे मागत असेल इतर काही अडचण असल्यास 94 23 97 94 92 या माझ्या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन शेतकरी कामगारपक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.तसेच काही तक्रारी आल्या तर गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा भाई मोहन गुंड यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा