महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केज च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केज च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.




केज

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष तथा दैनिक जनप्रवास चे संपादक सिद्धार्थजी भोकरे साहेब यांना अज्ञात इसमाने निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती.हा प्रकार दि.१५मे २०२५ रोजी उघडकीस आला जेव्हा सिद्धार्थजी भोकरे यांना भारतातील अभिनय क्षेत्रातील देश भक्तीवर परखड आणि जबाबदार वक्तव्य केले होते.सिद्धार्थजी भोकरे यांच्या या स्पष्ट मतावर आधारित एका अज्ञात इसमाने त्यांना धमकीचे पत्र पाठवले या पत्रात भोकरे यांना धमकावले गेले की तुम्ही खान बंधू ची माफी मागितली नाही तर तुम्हाला उडवून टाकले जाईल.

 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज यांच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला असून सिद्धार्थजी भोकरे यांना तातडीने सुरक्षा पुरविली जावी व जर आरोपीला तातडीने अटक केली नाही तर केज शाखेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करणारे आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हा हल्ला असून आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हादाखल करण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन श्री. संजयजी भोकरे व श्री. गोविंदजी वाकडे यांच्या आदेशानुसार तसेच श्री. वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई केज तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,सचिव विजय बिक्कड, कार्याध्यक्ष नंदुलाल मिसाळ,अध्यक्ष पत्रकार हल्ला विरोधी समिती विश्वास राऊत आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई