पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झाडे लावुया, झाडे वाढवु या,लाखो- करोडो आॕक्सिजन सिलेंडर पेक्षाही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करतात ही सहा प्रकारची झाडे

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झाडे लावुया, झाडे वाढवु या,लाखो- करोडो आॕक्सिजन सिलेंडर पेक्षाही अधिक ऑक्सिजनची निर्मिती करतात ही सहा प्रकारची झाडे.





भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माणझाली आहे.रुग्णालयात बेड्स ऑक्सिजन(Oxygen) ची मोठी कमतरता आहे.जाणकारांनी दिलेल्या माहिती नुसार,जर ही सहा प्रकारची झाडेअधिकाधिक लावली गेली असती,तर देशात ऑक्सिजनची कमतरता भासली नसती.आधी झाडांपासून ऑक्सिजन मिळत होता,आता फॅक्टरीमध्ये याची निर्मिती करावी लागते.वेळेसह आधुनिक होणाऱ्या जगात झाडांची मोठी कत्तल केली गेली,त्याचाच परिणाम पर्यावरणातऑक्सिजन कमतरता निर्माण झाली.जर जगात झाडेच नसतील,तर कितीही फॅक्टरी लावल्या,तरी ऑक्सिजन कमीच पडणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.जाणकारांनी झाडां बद्दल माहित देत,सर्वांनी जागरूक होऊन ही सहा प्रकारची झाडे लावण्याचे सांगितले आहे.

कडुलिंब - कडुलिंबांचं झाडं अनेक औषधी गुणांनी युक्त आहे.हे झाड पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करते. हे एकप्रकारे नॅचरल प्यूरिफायरच आहे.वातावरणातील अशुद्धी साफ करुन हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्याचं काम हे झाड करते.कडुलिंबांचं झाड लावल्याने आसपासच्या हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात,असे जाणकारांचे म्हणणे आहे.

जांभूळ - जांभळाचे झाड सल्फर आणि नायट्रोजनसारख्या गॅसेसला शुद्ध करतं. जांभळाच्या बियाही अतिशय फायदेशीर आहेत.हे झाडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही रिलीज करतात.

वड - वडाच्या झाडाला नॅशनल ट्री म्हटले जाते.वडाच्या झाडाची महत्त्वाची बाब म्हणजे, हे झाडं किती प्रमाणात ऑक्सिजन तयार करते हे त्याच्या सावलीवर अवलंबून असते. म्हणजेच वडाचं झाडं जितके मोठे असेल, तितका जास्त ऑक्सिजन मिळतो

अशोक - अशोकाचे झाडही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करुन पर्यावरणात सोडते.हे झाडं केवळ ऑक्सिजनचं प्रमाण वाढवत नाही,तर अशोकाचे झाड दुषित गॅसही शुद्ध करण्याचं काम करते.

अर्जुन - अर्जुन वृक्षाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.यामुळे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो,तसेच पर्यावरणातील अशुद्ध वायूही शुद्ध करण्याचं काम हे झाड करते.

पिंपळ - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळाचे झाड इतर कोणत्याही झाडाच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन निर्माण करते.हे झाड ६० ते ८० फुटांपर्यंत लांब असू शकते.हे झाडे त्याच्या आयुष्यात इतका ऑक्सिजन तयार करतात,की एखादी फॅक्टरीही करू शकत नाही.म्हणुन सुजाण नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य समजुन झाडे लावुया व त्यांचे संगोपन करुन पुढील पिढीला आगामी धोका ओळखून वेळीच सावध होऊन या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई