केज येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळे तील मुलांना गणवेश व पुस्तकांचे वाटप.


केज येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळे तील मुलांना गणवेश व पुस्तकांचे वाटप.

विद्यार्थ्यांनी आई वडिलांचे स्वप्ने पूर्ण करावीत - डॉ.हनुमंत सौदागर.



केज


आपण करत असलेली कष्ठाची कामे आपल्या मुलांच्या नशिबी येऊ नयेत त्याने उच्चशिक्षित व्हावे असे स्वप्न प्रत्येक मुलांचे आई वडील पाहत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांनी पाहिलेली स्वप्ने उच्च शिक्षित होऊन पूर्ण करावीत यासाठी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत आपली उपस्थिती लावणे गरजेचे आहे तसेच शाळेत एखाद्या विषयाचा प्रश्न समजला नाही तर तो परत शिक्षकाकडून समजून घेण्यासाठी कसलाही संकोच करू नये, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्राथमिक शिक्षण हे खूप महत्वाचे असल्याने विद्यार्थ्यांनी शाळेतून दिलेला गृहपाठ हि करणे गरजेचे असल्याचे मत भाऊसाहेब पाटील अद्यापक महा विद्यालयाचे प्रा.डॉ. हनुमंत सौदागर यांनी केज शहरातील अजिजपुरा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व पुस्तक वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.

केजशहरातील शुक्रवार पेठेतील अजिजपुरा येथील जिल्हा परिषदे च्या उर्दू प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळे मध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागतासह विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप,गणवेश वाटप व शूज व सॉक्स वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास भाऊसाहेब पाटील अद्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर, पत्रकार दीपक नाईकवाडे,शालेय समितीचे अध्यक्ष शेख बाबर रशीद,उपाध्यक्ष शेख मोहंमद तय्यब, शेख शाहेद,शेख अन्वरभाई ,सौ.सुमय्या मुंडे,सौ,मणियार तस्लिम आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शाळेत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आल्या नंतर उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह पुस्तक वाटप,गणवेश व शूज व सॉक्स यांचे वाटप उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी विद्यार्थ्यांना खेळातून शिक्षण व नवीन अभ्यासक्रमाची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाऊसाहेब पाटील अध्यापक महा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व विषद करून सांगताना आयुष्यात शिक्षण किती महत्वाचे आहे हे पटवून देत उच्च शिक्षण घेण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत असला पाहिजे व हा प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शाळेत शिकवलेले ज्ञान समजून घेणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाच्या धड्यातील प्रश्न जर समजला नसेल तर तो त्यांनी परत त्या विषया च्या शिक्षकाकडून समजून घेतला पाहिजे, शाळेत मुलांना पाठवताना आईवडील मोठे स्वप्न पाहत असतात ते साकार करण्याचे काम विद्यार्थ्यांनी शाळेत शिकून केले पाहिजे असे मत यावेळी डॉ. हनुमंत सौदागर यांनी व्यक्त केले.यावेळी शाळेच्यामुख्याध्यापिका  शेख सलमा हमीद, शाळेचे शिक्षक शेख मोहमद इंमतीयास, शाह अन्सार,दायमी नुरुस्सबा आदीउपस्थित होते या कार्यक्रमाचे  सूत्र संचालन शाळेचे शिक्षक कमठाणे फारुख मकबूल यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा