एसीइआरटी मार्फत घेण्यात आलेले निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वी रित्या संपन्न.
एसीइआरटी मार्फत घेण्यात आलेले निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वी रित्या संपन्न.
केज
राज्यशैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांच्या मार्फत माध्यमिक निवड श्रेणी प्रशिक्षण(२४)वर्ष हे दिनांक०२जुन २०२५ ते १२जुन २०२५ या कालावधीत प्रशिक्षण वर्ग साने गुरुजी निवासी विद्यालय केज या ठिकाणी नियमितपणे सुरू होते.या प्रशिक्षणा दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मूल्यांकनाच्या नवीन पद्धती,शिक्षकांचे स्व- विकास,मूल समजून घेताना,शिक्षणाचे ऑनलाइन स्त्रोत, शैक्षणिक संशोधन, नवोपक्रम,कृतीसंशोधन,ताण तणावाचे समा योजन,माहितीचा अधिकार कायदा,सेवा हमी कायदा,बालकाचा मोफत सक्तीचा अधि नियम २००९ यासारख्या अन्य विषयावरती प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच ५० गुणांची लेखी परीक्षा प्रशिक्षणार्थींची घेण्यात आली.यानंतर दिनांक १२जुन २०२५ च्या द्वितीय समयानंतर प्रशिक्षणाचा समारोप घेण्यात आला. अशा प्रकारे नियोजनाप्रमाणे हे प्रशिक्षण पूर्णतः यशस्वीरित्या पार पडले. या प्रशिक्षणामध्ये केंद्र समन्वयक म्हणून विजयकुमार सायगुंडे सर,वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अंबाजोगाई त्याचप्रमाणे प्रा.डॉ. कविता गित्ते, मुख्याध्यापक साने गुरुजी निवासीविद्यालय केज व इतर सुलभक यांनी या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्या साठी अथक परिश्रम घेतले व दहा दिवसाचे प्रशिक्षण यशस्वी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा