साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे निवड श्रेणी प्रशिक्षण संपन्न,डॉ.विजय सायगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी
साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे निवड श्रेणी प्रशिक्षण संपन्न,डॉ.विजय सायगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी.
केज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण चालू आहेत.केजयेथील साने गुरुजी निवासी विद्यालय केज या केंद्रा वर दि.२ जून २०२५ ते दि.१२ जून २०२५ या कालावधीत माध्यमिक स्तर निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमात ज्या कर्मचाऱ्यांना २४ वर्षे सेवा पूर्व करणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचारी यांचा यात समावेश आहे.
या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले असून कार्डिनेटर श्री. विजय सायगुंडे वरिष्ठ अधिव्याख्याता यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण प्रशिक्षण यशस्वी रित्या पार पाडण्यात आले आहे.यात संपूर्ण बीड जिल्ह्यातुन १६१ माध्यमिक निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी दररोज दहा दिवस प्रशिक्षणा साठी उपस्थित राहुन प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांना शैक्षणिक बदलाची जाणीव करून देणे त्यांना,नव्या शैक्षणिक बदलांची जाणीव करून देणे त्यांना नव्या धोरणाशी समायोजन करून गुणवत्ता पूर्ण अध्यापनासाठी तयार करणे,यामुळे विद्यार्थ्यां पर्यंत पोहोंचणारे शिक्षण अधिक परिणामकारक आणि समजून घेण्यास सुलभ होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, शालेय मूल्यांकन प्रक्रियेत बदल,भारतीय ज्ञान प्रणाली,सायबर सुरक्षा, शिक्षकांचे सक्षमीकरण ,शालेय नियोजन,माहिती अधिकार कायदा, मूल्यमापनाच्या विविध पद्धती,सेवा हमी कायदा,शालेय स्तरावरील विविध समित्या, मूळ समजून घेताना,वर्ग निरीक्षण शिक्षणाचे ऑनलाइन स्त्रोत,व्यवसाय मार्गदर्शन, कार्यालयीन लेखन कौशल्य व पत्रव्यवहार, ताण-तणावाला सामोरे जाताना,शालेय संस्कृती व शालेय प्रक्रिया,संवाद कौशल्य, शाळा मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा, मूल्यांची रुजवणूक,बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९,नेतृत्व विकास अशा विविध विषयांवर सखोल प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणात विचार प्रवण वाचन साहित्य, चर्चा,लेखन, सादरीकरण व वैयक्तिक डायरी लेखन या सारख्या उपक्रमांचा समावेश आहे. प्रशिक्षणा दरम्यान शिक्षकांना विशेषतः तयार करण्यात आलेले वाचन साहित्य पुरवले जात असून त्यात चिंतन,लेखन,चर्चा यासाठी प्रोत्साहन दिले जाते हे साहित्य विषयांची स्पष्टता, आकलन आणि कृती क्षमतेत वाढ करण्या साठी उपयुक्त ठरत आहे.प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले शिक्षक अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवत असून शास्त्रशुद्ध पद्धतीने आयोजित केलेले हे प्रशिक्षण त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे भविष्यकाळात हे प्रशिक्षण त्यांच्या अध्यापन पद्धतीत व वैयक्तिक व्यावसायिक विकासात मोलाचे ठरणार आहे.
हे प्रशिक्षण शिक्षकांना ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरत आहे.यांना १२ तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करत आहेत.डॉ.कविता कराड,डॉ.मनिषा नागरगोजे,कु.साक्षी कराड, श्री.काळकुटे सर,श्री.माने सर,डॉ.कांबळे मॅडम,श्रीमती रुपनर मॅडम,नय्युम शेख सर, श्री.कांबळे सर,श्री.आजगुंडे सर,श्री.वाघमारे सर हे उत्तम मार्गदर्शन करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा