केज-कळंब बसला लागली आग चालक वाहक यांच्या सतर्कते मुळे जिवीत हानी टळली,जुन्या बस मुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
केज-कळंब बसला लागली आग चालक वाहक यांच्या सतर्कते मुळे जिवीत हानी टळली,जुन्या बस मुळे प्रवाशांचा जीव टांगणीला.
केज
केज येथून कळंब कडे जाणाऱ्या धावत्या बस ने सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान अचानक पेट घेऊन बसला आग लागताच बस चालका च्या व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बस मधील प्रवाशी बालंबाल बचावले आहेत.या बाबत सविस्तर माहिती अशी की,कळंबआगारा ची केज येथून सुटलेली केज-कळंब ही बस बोबडेवाडी शिवारात आली असता धावत्या बस मधून चालकाच्या समोरच्या बाजूने बसने पेट घेतल्याचे बस चालकाच्या लक्षात येताच बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली व सर्व प्रवाशांनी तात्काळ खाली उतरण्याचे सर्वांना सांगितले.या मुळे बस मधील २० ते २२ प्रवाशांमध्ये एकच झुंबड उडाली.दरम्यान या गोंधळात ३ महिला जखमी झाल्या आहेत.
बसला समोरून लागलेल्या आगीमुळे बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच केज,व कळंब येथील अग्निशामक दलाला पेटलेली बस विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले.दोन्हीही अग्नि शामक दलाच्या गाड्या उशिरा आल्यामुळे तो पर्यंत बसची राख रांगोळी झाली होती. बस चालकाने केज पोलिसात बस पेटून नुकसान झाल्याची तक्रार दिली आहे. दरम्यान जुन्या बसला डागडुजी करून त्याच बस वापरात आणुन प्रवाशांना आपला जीव टांगणीला ठेवून प्रवास करावा लागत आहे. तसेच या बस मधुन धुराचे लोट निघत असुन प्रदुषण मोठ्याप्रमाणात हवेत पसरत आहे. त्यामुळे सुस्थितीतील बस महामंडळाने द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा