सिध्दार्थ भोकरे यांना धमकी देणाऱ्यांना तात्काळ अटक न केल्यास राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरून न्याय मागतील -प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी

सिध्दार्थ भोकरे यांना धमकी देणाऱ्यांना तात्काळ अटक न केल्यास राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरून न्याय मागतील -प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी.




बीड


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भैय्या भोकरे यांना अज्ञात इसमाने पत्राद्वारे जीवे मारण्याचे धमकी दिली आहे.धमकी देणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक केली नाही.तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीनेआंदोलन करतील असा इशारा पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी दिला आहे.


सिंदूर ऑपरेशन यशस्वीतेनंतर तरी बॉलीवूड अभिनेते खान बंधू यांनी पाकिस्तानचा निषेध करायला हवा होता.मात्र पाकिस्तान मधील अभिनेत्यांनी त्यांच्या देशाचा अभिमान असल्याचे दाखविले तसा आपल्या बॉलिवूड अभिनेते खान बंधू यांनी भारताबाबत अभिमान दाखवायला हवा होता असे परखड मत दि.१५ मे २०२५ रोजी प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांनी केले होते. त्याबाबत अज्ञात इसमाने खान बंधूची तू माफी माग नाही तर तुला उडून देऊ असे धमकीचे पत्र पाठवले आहे. हे धमकीचे पत्र पाठवण्याऱ्या  माथेफिरूला लवकरात लवकर अटक करून ठोस कारवाई करावी नसता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई राज्यभरात लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडेल असा इशारा पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई