15 जून रोजी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा - संपर्कप्रमुख वैभव स्वामी
15 जून रोजी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा - संपर्कप्रमुख वैभव स्वामी
बीड
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अंतर्गत मराठवाडा विभागाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन आणि मराठवाडा भूषण पुरस्कार सोहळा 2025 हा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर येथील संत एकनाथ रंग मंदिर उस्मानपुरा येथे होणार आहे. या पत्रकारांच्या अधिवेशनाला मराठवाड्यातील, राज्यातील पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे रौप्य महोत्सवी मराठवाडा विभागीय अधिवेशन रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी होणार आहे. सदरील अधिवेशन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सर, प्रदेश संघटक संजयजी भोकरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य समन्वयक नितीनजी शिंदे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी,राज्य उपाध्यक्ष अशोक देडे यांच्या विशेष सहकार्यातून मराठवाडा विभागीय अधिवेशनाचे आयोजक अनिल सावंत संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर छबुराव ताके यांची संपूर्ण टीम यशस्वीपणे प्रयत्न करत आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांच्या शुभहस्ते होणार आहे.या कार्यक्रमास महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज अध्यक्ष म्हणून लाभणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, जालन्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी हिरवळ, परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष जयदीपजी कवाडे, प्रसिद्ध अभिनेते योगेश शिरसाट, एबीपी माझा मुंबईच्या संपादिका सरिता कौशिक आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या अधिवेशनामध्ये भारतीय माध्यमांचा नेमका डीएनए कोणता यावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे उद्घाटक इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे लाभणार आहेत. तर संवादिका म्हणून पुणे येथील ख्यातनाम अश्विनीताई डोके यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.या परिसंवादामध्ये सहभागी होणाऱ्या वक्त्यांमध्ये एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, पुणे येथील प्रसिद्ध विचारवंत संजय सोनवणी,संभाजीनगर येथील प्रसिद्ध वक्ते अँड महेश भोसले,पुणे येथील प्रसिद्ध वक्ते अविनाश वानखेडे, संभाजीनगर येथील ऑनालायझरचे संपादक सुशील कुलकर्णी सहभागी होणार आहेत.
पत्रकारांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण होणारा परिसंवाद आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे अधिवेशन तसेच मराठवाडा भूषण पुरस्कार 2025 मध्ये संपूर्ण मराठवाड्यातील विविध क्षेत्रात, पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष गुण गौरव करण्यात येणार आहे.या शानदार सोहळ्याला आणि अधिवेशनाला मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, ग्रामीण भागातून त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांनी देखील मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनाला छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे आणि अधिवेशन न भूतो न भविष्यती साजरे करण्यासाठी पत्रकार आणि पत्रकार प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा