केज तालुक्यात तलाट्याचा मनमानी कारभार,आठ दिवसात तलाठी आपापल्या सज्जावर उपस्थित न राहिल्यास केज शिवसेना(उबाठा) वतीने दिला अमरण उपोषणाचा इशारा.
केज तालुक्यात तलाट्याचा मनमानी कारभार,आठ दिवसात तलाठी आपापल्या सज्जावर उपस्थित न राहिल्यास केज शिवसेना (उबाठा) च्या वतीने दिला अमरण उपोषणाचा इशारा.
केज
केज तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी आपापल्या सज्जावर उपस्थित राहावे.असे निवेदन केज तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.
केज तालुक्यातील एक ही तलाठी सज्जावर उपस्थित राहत नाहीत, ते तालुक्याच्या ठिकाणी बसून कारभार हाकतात. शासनाने दिलेले सज्जा वरील शासकीय कार्यालय धूळखात पडले आहेत. काही ठिकाणी तलाठी कार्यालयात जुगार खेळला जातो, काही ठिकाणी तलाठी कार्यालय जनावरांचे गोठे बनले आहेत.
शासनाने लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सोयीसाठी इमारती उभ्या केल्या परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. पीक विमा अनुदान अशा अनेक योजना साठी तलाठी कार्यालयातील कागदपत्राची आवश्यकता असते, पण सज्जावरील तलाठी कार्यालयात तलाठी हजर नसतात.
आठ दिवसात तलाठी आपापल्या सज्जावर उपस्थित न राहिल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा केज तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख अशोक जाधव यांनी दिला आहे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख दीपक बप्पा मोराले , युवासेना तालुका प्रमुख किशोर घुले, शहर प्रमुख तात्या रोडे, तालुका सचिव सखाराम वायबसे , जिल्हा संघटक दिलीप जाधव, उपशहर प्रमुख पप्पू ढगे , अशोक कोल्हे , महादेव घोळवे , प्रभाकर शिंदे, नारायण तांदळे, व शिवसेना पदाधिकारी , शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा