केज येथे माळेगाव ते चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी रथयात्रेचे उत्साहात स्वागत.

केज येथे माळेगाव ते चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी रथयात्रेचे उत्साहात स्वागत.



 

अहिल्यादेवी होळकरांनी समतेचा विचार दिला ---प्रा डॉ कुंभारगावे.


केज 

दि २९ मे २०२५ (गुरुवार)

 गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती रथामध्ये घेऊन पायी दिंडी 31 मे पर्यंत चौंडी ला जात असते या वर्षी या दिंडीचे आगमन बुधवार रोजी दुपारी केज येथे झाले.

केज शहरात नागरिकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन स्वागत केले .रथयात्रा दिंडीसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ह भ प संभाजी महाराज धुळगंडे,प्रा डॉ मुरहरी कुंभारगावे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ कुंभारगावे म्हणाले अहिल्यादेवी होळकरांचे विचार समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे मत व्यक्त केले. अहिल्यादेवीचे विचार सर्वांच्या मनावर रुजले पाहिजेत असे मत ह भ प संभाजी महाराज धुळगंडे यांनी व्यक्त केले

 लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विचाराचा जागर करत ही दिंडी अहिल्यादेवींचे चे जन्मस्थळ चौंडी येथे 31 मे रोजी जयंती दिनी पोहोचणार आहे.  महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी  केज शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दर्शना सह प्रबोधन कार्यक्रम घेण्यातआला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी 

बाळासाहेब गाढवे ,संजय रोडे, सिध्देश्वर गावड़े , कृष्णा रोडे, अशोक रोड़े,ओम चादर,राजेभाऊ डुकरे, शिवाजी चेपट ,तात्या रोड़े, बबलू रोड़े बालासाहेब गायके, जयदेव रोडे, पप्पू लांडगे,सुरज चादर ,बालाजी चादर,आबाराव लांडगे,मेघराज गावड़े ,रुहिदास गावड़े, सुखदेव लांडगे,शाहादेव सौदागर,डिंगाबर निगुळे, बालासाहेब,भुतकर,रामकिसन सौदागर,सतीष रोड़े, प्रभावती अनंत चादर, पार्वती सतीष रोडे,केवळबाई वसंत सौदागर, पुष्पा बाई सुखदेव लांडगे,काशिबाई काशिनात रोडे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत सौदागर यांनी केले.दर्शन सोहळ्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई