रेल्वे कामाच्या नावाखाली रस्त्याचे वाजले तीनतेरा

 रेल्वे कामाच्या नावाखाली रस्त्याचे वाजले तीनतेरा 




अवजड वाहन गेल्याने स्वखर्चाने बनवलेला रास्ता झाला चिकलमय


वडवणी/ 


वडवणी तालुक्यातील उपळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेल्या सावंत वस्ती वरील रस्त्याचे रेल्वेच्या कामामुळे तीनतेरा वाजले आहे. 

ब्राह्मणाथ तांडा ते सावंत वस्ती येथील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असतांना गत वर्षी प्रत्येक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्याला या रस्त्याबाबतीत संघीतल असता येथे कसल्याही प्रकारची कोणी दखल घेतली नाही त्यामुळे येथील लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते त्याच वेळी एक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी कसल्याच प्रकारचा वाहन जात नसल्याने येथील लोकांना घरातील चारपाई (बाजावर) रुग्णाला घेऊन ब्राह्मणाथ तांडा येथेन रुग्णाला रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतरही वेळोवेळी लोकप्रतिनिधीला येथील परिस्थिती दाखवूनही काही दखल न घेतल्याने व रस्ता तात्काळ बनवण्याची गरज असल्याने येथील रहिवासी असलेल्या लोकांनी स्वखर्चाने निधी जमा करून येथील रस्ता दुरुस्त करून घेतला होता परंतु सध्या रेल्वेचे कामे चालू असून रेल्वेचा १४ नंबरचा पूल बनवण्याचे कामे चालू आहे म्हणून त्या कामाला लागणारे साहित्य नेण्यासाठी अवजड वाहनाचा उपयोग होत असल्याने व सतत पाऊस पडत असल्याने येथील स्वखर्चाने बनवलेला रास्ता हा अत्यंत खराब झाला असून येथील शेतकरी व रहदारी करणाऱ्या नागरिकांना रेल्वेच्या कामामुळे पुन्हा तेच दिवस बघण्याची वेळ आली आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संताप निर्माण होत असून या भागातील खासदार व आमदार या लोकप्रतिनिधीनी काही अनर्थ घडण्यापूर्वी याकळे तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


चौकाट:- हा रस्ता बीड परळी मार्गाला जोडणारा मुख्य रस्ता  असून आमच्या वस्तीवरील महिलांना प्रसूतीसाठी, रुग्णांना उपचारासाठी व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खत,बी बियाणे व सर्व शेतीला लागणारी साहित्य नेण्यासाठी एकमेव रास्ता असल्याने सर्व शेतकरी व नागरिकांनी स्वखर्चाने हा रस्ता बनवला होता परंतु रेल्वेच्या कामासाठी भर पावसात अवजड वाहन गेल्यामुळे हा रस्ता पुन्हा चिकलमय झालं असून येथील शेतकऱ्यांना व रहिवाश्यांना रहदारीसाठी रस्ताच नाही त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ लक्ष द्यावे. यापूर्वी स्वखर्चाने आम्ही रास्ता केला होता परंतु येथील लोकांची गरीब परिस्थिती असून रेल्वेच्या गुत्तेदारांनाही लक्ष देऊन हा रस्ता करून घ्यावा.

विनायक शेळके 

उपसरपंच उपळी ग्रामपंचायत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ड्राय-डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या मस्साजोग येथील बियरबारवर केज पोलिसांची धडक कारवाई

बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा कोल्हेवाडी येथे उत्साहात साजरा