बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न
बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिर संपन्न * स्त्री सशक्तीकरणासाठी जनजागृती शिबिर अतिशय महत्वाचे-आरती जाधव * आत्मविश्वास आणि ठामपणा या बाजू मजबूत ठेवून महिलांनी अन्यायावर आवाज उठवावा- सीताताई बनसोड * कलंब दिनांक २४ ऑगस्ट २०२४ रोजी बंसल क्लासेस कळंब शाखेच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण या विषयवार कळंब शाखेत शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस उप-निरीक्षक तथा पिंक पथकाच्या प्रमुख उपविभाग कळंब आरती जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड मॅडम या देखील उपस्थित राहिल्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजीवनी जाधवर मॅडम बी. डी.एस.आणि मोडेल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.लता यंदे मॅडम या देखील आवर्जून उपस्थित राहिल्या. स्त्री सशक्तीकरण व महिलांच्या सुरक्षेचा विषय लक्षात घेता बंसल क्लासेस कळंब व केज शाखेचे संचालक यासीन हारूणभाई इनामदार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर का...